उपलब्ध असलेले कोर्स

TEST

TEST

Course start date: 12 सप्टेंबर 2026

sd

  • नोंदी केलेले विद्यार्थी: 1
संशोधनाची मूलतत्त्वे

संशोधनाची मूलतत्त्वे

Course start date: 8 ऑगस्ट 2026

संशोधनाची मूलतǂवे (Fundamentals of Research) : हा अभ्यासक्रम संशोधनाच्या मूलभूत तत्त्वांवर आणि वैज्ञानिक शोधप्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर सविस्तर प्रकाश टाकतो, ज्यामध्ये संशोधन समस्या, उद्दिष्टे, गृहीतके आणि माहिती विश्लेषणाचे महत्त्व स्पष्ट केले आहे. तसेच, शैक्षणिक संशोधनाची संकल्पना आणि त्याचे मूलभूत, उपयोजित व कृती संशोधन हे तीन प्रमुख प्रकार समजून घेऊन, शिक्षकांना शालेय स्तरावरील समस्या सोडवण्यासाठी संशोधक म्हणून कशी प्रभावी भूमिका बजावता येऊ शकते, याचे मार्गदर्शन करतो.

  • नोंदी केलेले विद्यार्थी: 4
शैक्षणिक संशोधनाचे दृष्टिकोन

या अभ्यासक्रमात संख्यात्मक, गुणात्मक आणि मिश्र संशोधन दृष्टिकोनांची सविस्तर ओळख करून दिली जाते. संख्यात्मक संशोधनातील संकल्पना, वैशिष्ट्ये, चल, संशोधन रचना आणि माहितीचे विश्लेषण यांचा अभ्यास केला जातो. तसेच गुणात्मक संशोधनामध्ये माहिती संकलन व विश्लेषणाच्या विविध पद्धती समजून घेतल्या जातात. मिश्र संशोधनाची गरज, प्रकार, डेटा एकत्रीकरण आणि उपयोग यावरही चर्चा केली जाते. शेवटी, विविध संशोधन दृष्टिकोनांची तुलना करून संशोधनाच्या उद्दिष्टांनुसार योग्य दृष्टिकोन निवडण्याचे निकष स्पष्ट केले जातात.

  • नोंदी केलेले विद्यार्थी: 1
संशोधनाच्या विविध पद्धती

संशोधनाच्या विविध पद्धती

Course start date: 4 सप्टेंबर 2026

या घटकात शैक्षणिक संशोधनासाठी वापरल्या जाणाऱ्या वर्णनात्मक, व्यष्टी अभ्यास, प्रायोगिक, प्राय-प्रायोगिक आणि ऐतिहासिक संशोधन पद्धतींची ओळख करून दिली जाते. प्रत्येक पद्धतीची संकल्पना, वैशिष्ट्ये, प्रक्रिया, माहिती संकलनाच्या पद्धती, उपयोग, फायदे आणि मर्यादा समजून घेत, संशोधनाच्या उद्दिष्टानुसार योग्य पद्धतीची निवड कशी करावी हे स्पष्ट केले जाते.

  • नोंदी केलेले विद्यार्थी: 1
माहिती संकलनाची साधने व तंत्रे

या घटकात संशोधनासाठी माहिती संकलित करण्याच्या विविध साधनांचा व तंत्रांचा परिचय करून दिला जातो. निरीक्षण, मुलाखत, प्रश्नावली, मतावली, रूब्रिक्स, पडताळा सूची, पदनिश्चयन श्रेणी आणि संपादन चाचणी यांची संकल्पना, प्रकार, रचना, उपयोग, फायदे व मर्यादा समजून घेत, संशोधनाच्या गरजेनुसार योग्य साधनाची निवड व प्रभावी वापर कसा करावा हे स्पष्ट केले जाते.

  • नोंदी केलेले विद्यार्थी: 1
संशोधनातील विविध संकल्पना आणि संशोधन आराखडा

या घटकात संशोधन प्रक्रियेतील महत्त्वाच्या मूलभूत संकल्पना आणि संशोधन आराखडा तयार करण्याची प्रक्रिया समजून घेतली जाते. संशोधन समस्या, उद्दिष्टे, संशोधन प्रश्न, परिकल्पना, जनसंख्या व नमुना यांसारख्या संकल्पनांचा अभ्यास केला जातो. तसेच संबंधित साहित्याचा आढावा, संशोधनातील अंतर (Research Gap) आणि पूर्वीच्या संशोधनाचे चिकित्सक विश्लेषण यांचे महत्त्व स्पष्ट केले जाते. शेवटी, संशोधन प्रस्तावाची रचना, वेळापत्रक आणि अपेक्षित निष्कर्ष यांचा समावेश असलेला प्रभावी संशोधन आराखडा तयार करण्याचे कौशल्य विकसित केले जाते.

  • नोंदी केलेले विद्यार्थी: 4
संशोधन कार्यपद्धती

संशोधन कार्यपद्धती

Course start date: 5 सप्टेंबर 2026

या घटकात संशोधनाची योग्य कार्यपद्धती निवडण्यापासून प्रत्यक्ष संशोधनाची अंमलबजावणी करण्यापर्यंतची प्रक्रिया समजून घेतली जाते. संशोधन दृष्टिकोन, संशोधन रचना, माहिती संकलनाची साधने, जनसंख्या व नमुना निवड यांचा अभ्यास केला जातो. तसेच पथदर्शी अभ्यास (Pilot Study), माहिती संकलन, नोंदी ठेवणे, वेळ व्यवस्थापन आणि गुणवत्ता नियंत्रण यांसारख्या प्रत्यक्ष संशोधन कार्यपद्धतींची ओळख करून दिली जाते. संशोधनादरम्यान येणाऱ्या संभाव्य अडचणी ओळखून त्यावर योग्य उपाययोजना करण्याचे कौशल्य विकसित केले जाते.

  • नोंदी केलेले विद्यार्थी: 4
माहितीचे विश्लेषण, अर्थनिर्वचन आणि निष्कर्ष

या घटकात संशोधनातून प्राप्त झालेल्या माहितीचे शास्त्रीय पद्धतीने विश्लेषण, अर्थनिर्वचन आणि निष्कर्ष मांडणी कशी करावी हे समजून घेतले जाते. वर्णनात्मक व अनुमानात्मक विश्लेषणामध्ये माहिती संपादन, कोडिंग, वारंवारता वितरण, केंद्रीय प्रवृत्ती, विचलन, सहसंबंध, t-परीक्षिका आणि p-मूल्य यांचा अभ्यास केला जातो. तसेच गुणात्मक माहितीचे Coding, Theme Development आणि आशय विश्लेषण यांसारख्या पद्धती समजून घेतल्या जातात. शेवटी, संशोधन निष्कर्ष, शिफारसी, शैक्षणिक परिणाम, संशोधनाच्या मर्यादा आणि पुढील संशोधनासाठी सूचना प्रभावीपणे मांडण्याचे कौशल्य विकसित केले जाते.

 
  • नोंदी केलेले विद्यार्थी: 3
संशोधनातील नैतिकता व अहवाल लेखन

या घटकात संशोधनातील नैतिकता, बौद्धिक संपदा हक्क आणि शैक्षणिक प्रामाणिकता यांचे महत्त्व समजून घेतले जाते. माहितीपूर्ण संमती, गोपनीयता, कॉपीराइट, प्लेजरिझम आणि APA 7 शैलीतील संदर्भलेखन यांचा अभ्यास केला जातो. तसेच संशोधन अहवालाची रचना, निष्कर्ष, चर्चा, शिफारसी, तक्ते व आलेख यांचा समावेश करून प्रभावी आणि शास्त्रीय पद्धतीने संशोधन अहवाल कसा लिहावा व सादर करावा हे शिकवले जाते.

 
  • नोंदी केलेले विद्यार्थी: 3
संदर्भ साहित्य

संदर्भ साहित्य

Course start date: 6 सप्टेंबर 2026

या घटकात संशोधनातील नैतिकता, बौद्धिक संपदा हक्क आणि शैक्षणिक प्रामाणिकता यांचे महत्त्व समजून घेतले जाते. माहितीपूर्ण संमती, गोपनीयता, कॉपीराइट, प्लेजरिझम आणि APA 7 शैलीतील संदर्भलेखन यांचा अभ्यास केला जातो. तसेच संशोधन अहवालाची रचना, निष्कर्ष, चर्चा, शिफारसी, तक्ते व आलेख यांचा समावेश करून प्रभावी आणि शास्त्रीय पद्धतीने संशोधन अहवाल कसा लिहावा व सादर करावा हे शिकवले जाते.

 
  • नोंदी केलेले विद्यार्थी: 4
लाईव्ह सेशन्स

लाईव्ह सेशन्स

Course start date: 15 ऑक्टोबर 2026

प्राध्यापक भाऊसाहेब आंधळे ह्यांचे लाईव्ह सेशन : संशोधन का करावे , 

वेळ : सकाळी ११ ते दुपारी २ 

तारीख : १५ ऑक्टोबर २०२६ 

  • नोंदी केलेले विद्यार्थी: 3